माझा कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही आणि राजकारणाशी चार हात लांबच राहणे मला पसंत असल्याचे बॉलीवूड अभिनेता आमिर खानने म्हटले आहे. तसेच लवकरच सुरू होणाऱया बहुचर्चित ‘सत्यमेव जयते’च्या दुसऱया पर्वात कोणत्याही राजकीय पक्षाला कार्यक्रमात समाविष्ट करणार नसल्याचेही आमिर म्हणाला.
आमिर खान म्हणतो की, मला राजकारणापासून दूरच राहायचे आहे. मला देशातील समस्याच महत्वाच्या वाटतात राजकीय पक्षांना मी महत्वाचे नाहीत. त्यामुळे कोणत्या पक्षाला पाठिंबा देण्यापेक्षा देशातील समस्यांवर लक्ष देणे मला महत्वाचे आणि गरजेचे वाटते. असेही आमिर म्हणाला. त्याचबरोबर सत्यमेव जयतेच्या दुसऱया पर्वातील कार्यक्रमाच्या चित्रिकरणावेळी हृदयाला भिडणाऱया कथा ऐकून मी अक्षरश: सेटवर रडलो आहे. एकवेळ तर, मी इतका रडलो की काही चित्रिकरण निर्मात्यांना वगळावे लागले. त्यामुळे राजकीय पक्षाला वेळ देण्यापेक्षा अशा विषयांना वेळ देणे महत्वाचे वाटते. असेही आमिरने स्पष्ट केले.
आमिर खानने वाहिली ‘माऊंटन मॅन’ दशरथ मांझीला आदरांजली
सत्यमेव जयतेच्या दुसऱया पर्वाच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी आमिर बिहारमधील गया येथे गेला होता. तेथील दशरथ मांझी या युवकाने आपल्या खेड्यात गावकऱयांसाठी रस्ता व्हावा यासाठी डोंगर फोडून काढला आणि रस्ता तयार केला. अशा कर्तृत्ववान युवकाला माझा सलाम असल्याचेही आमिरने म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा