सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, सोनू सूध आणि अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींनी ‘क्वीन’ चित्रपटातील कंगना राणावतच्या अभिनयाचे मोठ्याप्रमाणावर कौतुक केल्यानंतर, आता मि. परफेक्शनिस्ट आमिर खाननेदेखील चित्रपटाविषयीच्या आपल्या भावना टि्वटरवर व्यक्त केल्या आहेत. शनिवारी (८ मार्च) मुंबईत आमीर खानसाठी या चित्रपटाचा खास शो ठेवण्यात आला होता. चित्रपट पाहिल्यावर आपल्या भावना व्यक्त करताना आमीर म्हणाला, “काय चित्रपट आहे!!! तुम्ही सर्वांनी क्वीन पाहायलाच हवा!!! ज्या कोणी हा चित्रपट अजून पाहिलेला नसेल, त्यांनी त्वरीत जाऊन हा चित्रपट पाहावा.” लग्नाच्या एक दिवस आधी नवरदेव विजयने (राजकुमार राव) लग्नास नकार दिल्यावर एकटीनेच हनिमुनला गेलेल्या राणीला (कंगना राणावत) स्वत:मधील क्षमतेची ओळख पटते. या कथेवर आधारित ‘क्वीन’ चित्रपट आजच्या सर्व तरूण मुली आणि मुलांसाठी फार महत्वाचा असल्याचे आमिर खानचे मानणे आहे. या विषयीच्या टि्वटरवरील संदेशात तो म्हणतो, “प्रत्येक मुलीसाठी हा चित्रपट महत्वाचा आहे, प्रत्येक स्त्रीने पाहावा, असा हा चित्रपट आहे… आणि खरतर प्रत्येक पुरूषांनेसुद्धा पाहायला हवा!”
समीक्षक आणि प्रेक्षकांकडून पसंती मिळालेला हा चित्रपट पाहून आमीर खान प्रभावित झाला आहे. अशा प्रकारचा चित्रपट बनविण्यासाठी विकास बहलला धन्यवाद देताना आमीर म्हणाला, “हा चित्रपट बनविण्यासाठी विकास बहल आणि टीमचे धन्यवाद. आणि कंगना… यु रॉक!!! लव्ह. a.”
‘क्वीन’ कंगनावर आमीर खानकडून कौतुकाचा वर्षाव!
सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी, सोनू सूध आणि अन्य बॉलिवूड सेलिब्रिटींनी 'क्वीन' चित्रपटातील कंगना राणावतच्या अभिनयाचे मोठ्याप्रमाणावर कौतुक केल्यानंतर, आता मि. परफेक्शनिस्ट आमिर खाननेदेखील...

First published on: 10-03-2014 at 06:30 IST
TOPICSकंगना रणौतKangana RanautबॉलिवूडBollywoodहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan in awe of kangana ranauts queen