बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री करीना कपूर खान स्क्रीन शेअर करणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार पद्धतीने प्रमोशन केले जात आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकतंच अभिनेता आमिर खानने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी आमिर खानने ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे नाव, त्यातील भूमिका, चित्रपट निवडण्यामागचे कारण यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

आमिर खान आणि करीना कपूर खान यांची मुख्य भूमिका असलेला ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. देशातील तब्बल १०० लोकेशनवर या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं आहे. अद्वैत चंदन यांचं दिग्दर्शन असेलल्या या चित्रपटाची पटकथा एरिक रोथ आणि अतुल कुलकर्णी यांनी लिहिली आहे. हा चित्रपट येत्या ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटावरुन ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे कथानक तयार करण्यात आले आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे.

“आम्ही कधी यशस्वी होतो तर कधी अयशस्वी पण तुम्ही…” नागराज मंजुळेंबाबत आमिर खानने केलेले ‘ते’ वक्तव्य चर्चेत

या चित्रपटात आमिर खानने भूमिका निवडण्यामागचे कारण काय? तो चित्रपट निवडण्यामागचे कारण काय? यातील भूमिकेबाबत वैयक्तिक मत काय? याबद्दल भाष्य केले. यावेळी आमिर खानने नागराज मंजुळेंना तुम्ही लाल सिंग चड्ढा चित्रपट कधी पाहणार? असा प्रश्न विचारला.

त्यावर नागराज मंजुळे म्हणाले “मी हा चित्रपट पहिल्या दिवशी चित्रपट पाहणार आहे.” त्यावर आमिर खान म्हणाला, “नाही नाही. त्याआधी मी जेव्हा स्क्रिनिंग ठेवेन तेव्हा तुम्ही या. त्यावेळी तुम्ही हा चित्रपट पाहा”, असे म्हटल्यानंतर नागराज मंजुळेंनीही होकार दिला. “पण तुम्ही चित्रपट पाहणार हे ऐकूनच मी तणावाखाली आलो आहे. माझे हृदय आतापासून धडधडत आहे”, असेही आमिर खानने म्हटले.

‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाच्या भूमिकेबद्दल वैयक्तिकरित्या काय वाटतं? आमिर खान म्हणाला “आपल्यातील सर्व चांगुलपणा…”

या मुलाखतीदरम्यान आमिर खानने नागराज मंजुळेंबद्दल गौरवोद्गार काढले. ‘तसेच त्याने मी तुमचा खूप मोठा चाहता आहे’ असेही नागराज मंजुळेंना सांगितले. “मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. तुम्हाला याची कल्पनाही नाही. तुम्ही इतक्या वेळेपासून बोलत आहात, पण आता मला तुमच्याबद्दल बोलायचं आहे”, असे आमिर खान म्हणाला.

Story img Loader