बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. भारतात सुरफ्लॉप ठरलेला हा चित्रपट परदेशात मात्र चांगली कमाई करत असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

प्रदर्शनाच्या ११ दिवसांमध्ये चित्रपटाने देशभरात बॉक्स ऑफिसवर ५४ कोटी १० लाख रुपये कमाई केली. तर दुसरीकडे परदेशात या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका येथे हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहत असल्याची चर्चा आहे. म्हणूनच ‘लाल सिंग चड्ढा’च्या जगभरातील कमाई पाहता या आकडेवारीमध्ये वाढ झाली आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ने परदेशात प्रदर्शनाच्या ११ दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर ५० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. म्हणजेच जगभरात ‘लाल सिंग चड्ढा’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने १०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला असल्याची चर्चा आहे. आता चीनमध्येही हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमिरचा विचार आहे.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ पाहिल्यानंतर स्वरा भास्करचं ट्वीट, म्हणाली, “आमिर खान म्हणजे…”

याआधी आमिरच्या ‘पीके’, ‘दंगल’, ‘सीक्रेट सुपरस्टार’ चित्रपटांनी चीन बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. आता ‘लाल सिंग चड्ढा’ देखील चीनमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आमिर प्रयत्न करत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ला चीनमध्ये उत्तम प्रतिसाद मिळेल अशी या चित्रपटाच्या निर्मात्यांना अपेक्षा आहे.