बॉलिवूड अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chaddha) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं आहे. ११ ऑगस्टला आमिरचा हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाला. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाबाबत नकारात्मक चर्चा सुरु होत्या. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत तर आमिरने स्वतः प्रतिक्रिया दिली होती. शिवाय चित्रपट पाहण्यासाठी देखील त्याने प्रेक्षकांना आवाहन केलं. मात्र या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा – यावर्षी चिपळूणमध्ये पूर का आला नाही? अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सांगितलं कारण

‘लाल सिंग चड्ढा’बाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांमुळे चित्रपट चालणार का? हा मोठा प्रश्नच होता. आमिरचा चित्रपट म्हटलं की प्रेक्षक चित्रपटगृहांबाहेर गर्दी करणार अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र प्रत्यक्षात काही वेगळंच पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी १२ कोटी रुपये कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईचा आकडा पूर्णच घसरला. दुसऱ्या दिवशी फक्त ७ कोटी ५० लाख रुपये या चित्रपटाने कमावले. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या चित्रपटाचे काही शो रद्द करण्यात आले. चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकच नसल्याने हा निर्णय घ्यावा लागला.

बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार ‘लाल सिंग चड्ढा’ने शनिवारी फक्त ९ ते १० कोटी रुपयांची कमाई केली. विकेण्डला तरी हा चित्रपट चांगली कामगिरी करणार असं बोललं जात होतं. पण बॉक्स ऑफिस कलेक्शनचे आकडे पाहता चित्रपटाच्या पदरी अपयश आल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. १५ ऑगस्ट आणि विकेण्डचा चित्रपटाला फायदा होईल अशी चर्चा अजूनही सुरु आहे.

आणखी वाचा – “३० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले पण…” ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘लाल सिंग चड्ढा’ हा टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलीवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि मोना सिंग यांच्याही भूमिका आहेत.दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.