बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमीर खान याने सुप्रसिद्ध अॅक्शन स्टार जॅकी चॅनसोबत काम करण्यास नकार दिला आहे. चीन व भारताच्या संयुक्त निर्मितीतून साकारल्या जाणाऱया ‘कुंग फू योगा’ या चित्रपटात आमिर व जॅकी ही जोडी प्रमुख भूमिकेत दिसेल अशी बातम्या काही दिवसांपूर्वी बॉलीवूड जगतात सुरू होत्या. या दोन्ही सुपरस्टार्सना एकत्रित पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक होते मात्र, आगामी ‘दंगल’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे जॅकी चॅनच्या चित्रपटात काम करता येणार नसल्याचे आमीर स्पष्ट केले आहे. आमीर म्हणाला की, जॅकी चॅनसोबत काम करायला नक्की आवडले असते. चीनमध्ये पीके चित्रपटाच्या प्रिमिअरवेळी जॅकीशी भेट झाली होती. जॅकी भरपूर चांगला व्यक्ती आहे. त्याने मला डिनरचेही निमंत्रण दिले आम्ही एकत्र जेवण सुद्धा केले. मी जॅकीचा फॅन राहिलो आहे. जॅकी चॅनचे बहुसंख्य चित्रपट दिग्दर्शित करणारा स्टॅनली टाँग ‘कुंग फू योगा’चे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण याच वर्षी करण्याचा स्टॅनलीचा विचार आहे. मात्र त्याचवेळी आपण ‘दंगल’च्या चित्रीकरणात व्यस्त असणार आहोत. तारखा एकमेकांशी जुळत नसल्याने नसल्याने आपण हा चित्रपट करू शकत नाही असे आमिरने एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले.

Story img Loader