बॉलीवूडच्या मि.परफेक्टशनिस्टला एक विलक्षण व्यवसाय प्रस्ताव आला आहे. लिठ्ठीचोखा या खाद्याचे काही स्टॉल सुरु करण्याचा प्रस्ताव आमिरला आला आहे.
आगामी ‘पीके’ चित्रपटाची प्रसिद्ध करत असलेल्या आमिरने काही दिवसांपूर्वी पटना येथील लिठ्ठीचोखा स्टॉलवर सदर खाद्याचा आस्वाद घेतला होता. त्याआधी दोन वर्षांपूर्वीही याच स्टॉलवर त्याने लिठ्ठीचोखा खाल्ले होते. आमिरचे हे आवडते खाद्य असल्याचे त्याने त्यावेळी सांगितले होते. आमिरने स्टॉलवर भेट दिल्यानंतर स्टॉल मालकाने त्याच्यासमोर भागीदारीमध्ये व्यवसाय सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला. आमिरने दोन वर्षापूर्वी आपल्या स्टॉलला भेट दिल्यानंतर व्यवसायात कशी वाढ झाली याबाबत स्टॉल मालकाने त्याला सांगितले. त्यामुळे, लिठ्ठीचोखाचा स्वाद अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आमिरसह भागीदारी करण्याची इच्छा मालकाने त्याच्यासमोर व्यक्त केली. आमिरला पहिल्यांदाच असा विलक्षण व्यवसाय प्रस्ताव आल्यामुळे त्याला हसू अनावर झाले आणि आपण या प्रस्तावाबाबत नंतर विचार करू असे त्याने म्हटले.
१९ डिसेंबरला ‘पीके’ प्रदर्शित होत असून त्याबाबत प्रेक्षकांमध्येही खूप उत्सुकता आहे.

Story img Loader