‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाद्वारे समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांना जनतेसमोर आणणा-या मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने एक नवी प्रतिज्ञा केली आहे. सत्यमेव जयतेच्या तिस-या पर्वात सध्या रस्त्यावरील अपघात की हत्या? या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमिरने आपण अपघात झाल्यावर समोरच्या व्यक्तीकडे त्रयस्थपणे न बघता त्याला अजिबात पुढेमागे न पाहता लगेचच मदत करू अशी प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, अंदाजे भारतात दर दिवशी ३८० लोकांचा मृत्यू केवळ अपघातामुळे होतो. खरं तर, यातील बहुतेकजणांचा मृत्यू हा अपघात नसून हत्या असल्याच्या मुद्दयावर कार्यक्रमात विशेषपणे मांडण्यात आले.

Story img Loader