अभिनेता आमीर खानने ‘नटसम्राट’ चित्रपटातील नाना पाटेकर यांच्या अभिनयाचे तोंड भरून कौतूक केले आहे. या अभिनयाचे वर्णन ‘असा नट होणे नाही‘ असेच करावे लागेल, असे आमिरने ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटले आहे.
आमीरने म्हटले आहे की, “मी काल रात्री नटसम्राट पाहिला. काय चित्रपट आहे! नानाचा अभिनय विलक्षण आहे. खरोखरच “असा नट होणे नाही‘ अभिनयावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हा चित्रपट बघायला हवा. विक्रमजी हे ही काही कमी नाहीत. उत्कृष्ट! नाना आणि विक्रमजी यांच्या अभिनयाने मला खिळवून ठेवल्याचे आमिरने सांगितले.

Story img Loader