बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच दिवशी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘केजीएफ २’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आमिरचा लाल सिंह चड्ढा आणि केजीएफ २ चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहेत. कोणता चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. दरम्यान, आमिरने केजीएफ चित्रपटाच्या निर्मात्यांची माफी मागितली आहे.
करीना कपूर खान आणि आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहात. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, लाल सिंह चड्ढा चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख घोषीत केल्यानंतर आमिर खानने केजीएफ चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता यशची माफी मागितली आहे. कारण केजीएफ चित्रपटच्या प्रदर्शनाच्या दिवशीच लाल सिंह चड्ढा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा : ‘मी होणार सुपरस्टार’मध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकाच्या आईने चक्क विकले मंगळसूत्र
मागच्या वर्षी, करीनाने आमिर खानसोबत इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करत, “प्रत्येक प्रवासाचा शेवट हा येतोच, आज माझ्या लालसिंग चड्ढा या आगामी चित्रपटाचे शूटिंग संपले, कोविड, माझी प्रेग्ननसी आणि भीती हे सगळं असले तरी सगळी काळजी घेऊन शूट केले आहे”, अशा आशयाचे कॅप्शन तिने दिले होते. तसेच संपूर्ण टीमचे आभार देखील मानले होते.
‘लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात आमिर एक पंजाबी व्यक्तिरेखा साकारत आहे. लॉकडाउन नंतर राहिलेल्या चित्रपटाचे चित्रीकरण पुन्हा सुरु करण्यात आले. हा चित्रपट १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.