खरचं खरे मित्र! बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आणि दबंग सलमान खान हे खूप चांगले मित्र आहेत, याबद्दल काहीच शंका नाही. या मैत्रीला जागत आमिर खान आता सलमानच्या ‘जय हो’चे प्रमोशन करण्याकरिता सज्ज झाला आहे. ट्विटवर त्याने “जय हो प्रदर्शित होण्यास ११ दिवस बाकी”, असे ट्विट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

‘धूम ३’मध्ये आमिरने घातलेली हॅट घालून सलमाननेही ‘बिग बॉस ७’च्या सेटवर चित्रपटाचे प्रमोशन केले होते. आता यावेळी आमिरची टर्न आहे असे वाटते. तो जय होच प्रमोशन करत आहे. पण, ‘धूम ३’ प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने टीव्हीवरील प्रमोशनपासून स्वतःला दूर ठेवले होते. आमिर आणि सलमानने ‘अंदाज अपना अपना’ या १९९४ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने त्यांच्या जोडीची छाप सोडली होती. तसेच, कॉफी विथ करण या चॅट शोमध्येही सलमानशी आपले चांगले मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे आमिर म्हणाला होता.