काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘३ इडियट्स’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. कोटींचा गल्ला कमविणा-या या चित्रपटाचा लवकरच सिक्वल येण्याची शक्यता असल्याचे स्वतः आमिर खानने सांगितले.
आर माधवनची प्रमुख भूमिका असलेला साला खडूस आज प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची विशेष स्क्रिनिंग आमिरसाठी ठेवण्यात आली होती. त्यावेळी आमिरने ‘३ इडियट्स’च्या सिक्वलची हिंट आपल्या चाहत्यांना दिली. तो म्हणाला की, राजकुमार हिराणी यांनी ‘थ्री इडियट्स’च्या सिक्वल विषयीची इच्छा माझ्यासमोर बोलून दाखविली आणि तिच हिंट मी तुम्हाला देत आहे. जेव्हा राजकुमार हिराणी चित्रपटाची कथा लिहतील त्यावेळी हा चित्रपट नक्की होईल.
आमिर खान सध्या ‘दंगल’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी आमिरने वजन वाढवले होते. मात्र, आता चित्रपटातील त्याच्या तरुणपणीच्या भूमिकेसाठी त्याला २५ किलो वजन कमी करावे लागणार आहे.

Story img Loader