आपल्या देशामध्ये काश्मीर प्रश्न हा अत्यंत ज्वलंत विषय मानला जातो. नव्वदीच्या दशकामध्ये वाढत्या दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकारने तेथे सैन्याला पाचारण केले होते. कारगिलच्या युद्धानंतर हा मुद्दा अधिक चिघळला. या काळात तेथील स्थानिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागला. याच सुमारास मल्टीप्लेक्स ही नवी संकल्पना देशात रुजत होती. १९९९ मध्ये काश्मीरमध्ये मल्टीप्लेक्स बांधण्याचा विचार तेथील चित्रपटगृहांच्या मालकांनी केला होता. पण सुरु असलेल्या चित्रपटगृहांवर मर्यादा आल्याने तो विचार कोणालाही सत्यात उतरवता आला नाही.

काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी नुकतेच काही फोटो ट्वीट केले आहेत. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी काश्मीर खोऱ्यात सुरु झालेल्या पहिल्या मल्टीप्लेक्सच्या उद्घाटनाची घोषणा केली. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंद्वारे या मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहामध्ये ‘आरआरआर’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचे स्क्रीनिंग झाली असल्याचे लक्षात येत आहे. हा स्पेशल स्क्रीनिंग शो मनोज सिन्हा यांच्यासह काही निवडक अधिकाऱ्यांसाठी ठेवला होता. सदर मल्टीप्लेक्स पुलवामा आणि शोपियान जिल्ह्यामध्ये स्थित आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट तेथे प्रदर्शित होणार होता. पण काही कारणांमुळे ते शक्य झाले नाही. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ काश्मीरमधल्या पहिल्या मल्टीप्लेक्समध्ये दाखवला गेलेला पहिला चित्रपट ठरणार आहे. हा शो मोजक्या लोकांसाठी ठेवण्यात आला आहे. राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट या मल्टीप्लेक्समध्ये लोकांसाठी प्रदर्शित होणार पहिला चित्रपट असणार आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्यामुळे तो बंद ठेवण्याचा निर्णय मालकाने घेतला आहे. पुढच्या महिन्यात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चित्रपटगृहे लोकांसाठी खुली होणार आहेत. एका मोठ्या सभागृहाच्या जागेवर चित्रपटगृहांची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा – ‘विकी डोनर’ दिसणार आता स्त्रीरोग तज्ञाच्या भूमिकेत; आयुष्मानचा ‘डॉक्टर जी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

दरम्यान काश्मीरमधल्या अन्य शहरांमध्येही लवकरच मल्टीप्लेक्स बांधले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Story img Loader