करण जोहरचा प्रसिद्ध चॅट शो ‘कॉफी विथ करण 7’ सध्या खूप चर्चेत आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारवर सुरू झालेल्या या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना आहे. या शोमध्ये आतापर्यंत अक्षय कुमार, समंथा, रणवीर सिंग, आलिया भट्ट, विजय देवरकोंडा या स्टार कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यानंतर आता शोच्या आगामी एपिसोडमध्ये बॉलिवूड मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि करीना कपूर दिसणार आहेत. नुकताच नव्या एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नवीन एपिसोडबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करण जोहरनं हा प्रोमो त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आमिरची खिल्ली उडवताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये करीना आमिरला म्हणताना दिसते की, अक्षय त्याच्या चित्रपटाचे शूटिंग ३० दिवसांत पूर्ण करतो, आणि तू तर १००-२०० दिवस घालवतो. एवढंच नाही तर करीना आमिरच्या ड्रेसिंग सेन्सबद्दलही बोलताना दिसत आहे. ती आमिरला अजिबात ड्रेसिंग सेन्स नसल्याचं बोलताना दिसते. ज्यावर आमिर खान हसत करणला म्हणतो की, जेव्हाही तू शो करतोस तेव्हा कोणाचा ना कोणाचा अपमान होतो. आता करीना सातत्याने संपूर्ण शोमध्ये माझा अपमान करत आहे.

आमिरचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता करण जोहरच्या इन्स्टाग्रामवरही आमिरला ट्रोल केलं जात आहे. युजर्स या व्हिडिओवर कमेंट करून चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर लाल सिंह चड्ढा बॉयकॉटचा ट्रेंड सुरू झाला होता, त्यानंतर आमिरनं या चित्रपटावर बहिष्कार न टाकण्याचं आवाहन केलं होतं.

आणखी वाचा- “त्यांना वाटतं माझं देशावर प्रेम नाही…” ‘लाल सिंह चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर आमिर खानची प्रतिक्रिया

आमिर आणि करीना यांनी त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यांचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट ११ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे आमिर बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan talk on koffee with karan 7 say i got insulted in this show know why mrj