नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अभिनेता आमिर खान कर्जत येथील एनडी स्टुडिओत पोहोचला. नितीन यांना अखेरचा निरोप दिल्यानंतर आमिरने माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने नितीन देसाईंशी झालेल्या शेवटच्या भेटीबद्दल माहिती दिली. तसेच नितीन यांच्या दुर्दैवी निधनाने धक्का बसल्याचं म्हटलं आहे.

मोठी बातमी! नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात ५ जणांविरोधात पहिला गुन्हा दाखल

आमिर खान म्हणाला, “मी आणि नितीन एकमेकांना बऱ्याच काळपासून ओळखत होतो. ही खूपच दुःखद व धक्कादायक घटना आहे. हे सगळं कसं घडलं हेच मला कळत नाहीये. या घटनेवर मला विश्वासच बसत नाहीये. त्यांनी आत्महत्येसारखं पाऊल उचलण्याऐवजी मदतीसाठी विचारणा केली असती तर बरं झालं असतं. नितीन देसाई खूप क्रिएटीव्ह होते. त्यांनी अनेक चित्रपटांसाठी उत्तम काम केलं आहे. त्यांचं त्यांच्या कामावर प्रचंड प्रेम होतं. आम्ही एका प्रतिभाशाली व्यक्तीला गमावलं आहे, ते खूप खास होते.”

आमिरने नितीन देसाईंबरोबर झालेल्या शेवटच्या भेटीची आठवण सांगितली. “त्यांच्या मुलीच्या लग्नाआधी म्हणजेच ८-१० महिन्यांपूर्वी ते मला भेटायला आले होते. ते मला मुलीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते. मी तेव्हा शुटिंग करत होतो. तेव्हा आम्ही दीड-दोन तास गप्पा मारल्या होत्या. खूप दिवसांनी आमची भेट झाली होती. त्यावेळी ते खूप आनंदी दिसत होते. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाने धीर ठेवावा,” असं आमिर म्हणाला.

Story img Loader