खान परिवारात सध्या आनंदाचे वातावरण आहे. लवकरच बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आजोबा होणार आहे. आमिरचा भाचा इमरान खान आणि अवंतिका हे दांमपत्य घरात येणाऱ्या एका नव्या छोट्या पाहुण्याच्या प्रतिक्षेत आहे. अवंतिका तीन महिन्यांची गरोधर असून, २०१४च्या जून महिन्यात खान परिवारात या छोट्या बाळाचे आगमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या वैद्यकीय चाचणीत अवंतिकाला डेंग्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. याच चाचणीदरम्यान बॉलिवूडमधील या दांमपत्याला ही गोड बातमी समजली. इमरानचे चाहते ही गोड बातमी ऐकून नक्कीच खूश झाले असणार.

Story img Loader