हिंदी चित्रपटसृष्टीत मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेला अभिनेता आमीर खानचा आज आपला वाढदिवस आगामी ‘धूम ३’ चित्रपटाच्या चित्रीकऱणामध्ये व्यस्त राहून साजरा करतोय. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आमीर सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मिती करण्यात येत असलेल्या या चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन सध्या चित्रीत करण्यात येतोय. त्याच्याच चित्रीकरणामध्ये आमीर गुंतला आहे.
आमीर खान आज ४८ व्या वर्षात पदार्पण करतोय. मनापासून आपल्या कामावर प्रेम करणाऱया आमीरने आज वाढदिवस म्हणून चित्रीकरणातून सुटी घेतलेली नाही. नेहमीप्रमाणे तो त्याच्या कामात गुंतलेला आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत अभिषेक बच्चन, उदय चोप्रा आणि कतरिना कैफ हे कलाकार आहेत. हे सर्वजण सध्या स्वित्झर्लंडमध्ये आहेत. आमीरच्या वाढदिवसानिमित्त कदाचित या सगळ्यातर्फे पार्टी आयोजित केली जाऊ शकते. मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरवर आमीरच्या मित्रपरिवाराने आणि बॉलिवूडमधील कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Story img Loader