पुढील महिन्यात होत असलेल्या ‘अपीजय कोलकता लिटररी फेस्टिव्हल’मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात अभिनेता आमिर खान ‘मौलाना आझाद यांचा निधर्मीपणावरील विश्वास आणि दूरदृष्टी’ यावर व्याख्यान देणार असल्याचे ‘एकेएलएफ’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
८ जानेवारीला महोत्सवाचे उदघाटन होत असून, त्याच दिवशी आमिर खान या राष्ट्रीय पुरुषाची आदर्श आणि मूल्ये अधोरेखित करणार आहे. यावेळी पश्चिम बंगालचे राज्यपाल एम. के. नारायण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत. मौलाना आझाद हे आमिर खानचे पंजोबा असून, आमिरची आजी ही आझाद यांची भाची होती. आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांच्या आदर्शांनी प्रेरित झालेल्या आमिरने आपल्या मुलाचे नाव आझाद असे ठेवले. सहा दिवस चालणारा हा महोत्सव आझाद यांना प्रिय असलेली मूल्ये आणि साहित्यावर प्रकाश झोत टाकणार आहे.
भारत आणि युरोपातील जवळजवळ ६० लेखक महोत्सवात उपस्थिती लावणार आहेत. पिढ्यानुरूप नव्या युगाचे लेखन, महिला सबलीकरण आणि साहित्यिक ओळख अशा विविध विषयांवरील आयोजीत चर्चासत्रात ते भाग घेणार आहेत.
आमिर खान सांगणार मौलाना आझाद यांचे विचार
पुढील महिन्यात होत असलेल्या 'अपीजय कोलकता लिटररी फेस्टिव्हल'मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात अभिनेता आमिर खान 'मौलाना आझाद यांचा...
First published on: 17-12-2013 at 08:02 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan to pay tribute to maulana azad