मराठी सिनेसृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेला व्ही शांताराम दिग्दर्शित नव्या ढंगातला ‘पिंजरा’ सिनेमा पाहण्याची इच्छा मि .परफेक्टनिस्ट आमिर खानने व्यक्त केली आहे. याविषयीच ट्विट त्यांनी नुकतंच  केलं आहे.
महान दिग्दर्शकांचे सिनेमे थिएटरमध्ये पहायला मिळत नाही. थिएटरमध्ये हे सिनेमे पाहणे समृद्ध अनुभव असतो. ‘पिंजरा’सारखी अजरामर कलाकृती पाहण्यासाठी मी खूप उत्सुक असल्याचं आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. रसिकांनीही ही संधी दवडू नये चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा प्रत्येकाने अवश्य पहाण्याची विनंती आमिरने केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


चंद्रसेना पाटील आणि पुरुषोत्त्म लढ्ढा यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला असून १८ मार्चला प्रदर्शित झालेल्या ‘पिंजरा’ चित्रपटाला रसिकांचा ही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.