मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. मराठी मालिका आणि चित्रपटांनंतर अमृताने बॉलिवूड चित्रपटांमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संपूर्ण देशभरात अमृताच्या अभिनयाचे चाहते आहेत. एवढंच नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आमिर खानही अमृता सुभाषचा चाहता आहे. लाखो तरुणींचं प्रेम असणाऱ्या आमिर खानने अमृता सुभाषला प्रपोज केलं होतं आणि याचा किस्सा तिने नुकताच शेअर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री अमृता सुभाषने झी मराठीचा लोकप्रिय चॅट शो ‘बस बाई बस’मध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी आमिर खानच्या प्रपोजचा किस्सा शेअर केला. हा किस्सा सांगताना ती चक्क लाजताना दिसली. या शोमध्ये सुत्रसंचालक सुबोध भावेशी अमृता सुभाषने दिलखुलास गप्पा मारल्या आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. सुबोध भावेने या मंचावर आमिरने अमृताला लिहिलेल्या प्रेमपत्राचा उल्लेख केल्यानंतर अमृताने हा किस्सा शेअर केला.
आणखी वाचा- जेव्हा टॉपलेस अभिनेत्रीसह दिलेल्या ‘त्या’ वादग्रस्त सीनमुळे अडचणीत आले होते शक्ती कपूर

अमृता सुभाषला सुबोध भावे म्हणाला, “कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या आमिर खानने तुला प्रपोज केलं होतं. याबद्दल काय सांगशील?” यावर अमृता लाजत म्हणाली, “मला त्यावेळी एक पत्र आलं होतं आणि तेही इंग्लिशमध्ये. मी ते पाकीट उघडलं आणि त्यात लिहिलं होतं, ‘प्रिय अमृता, खूप आणि खूप साऱ्या प्रेमासह… आमिर…”

आणखी वाचा- “पुनःश्च हनिमून”, अभिनेत्री अमृता सुभाषचा मजेशीर व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान अमृता सुभाषच्या कामाबद्दल बोलायचं तर तिची मराठी मालिका ‘अवघाची हा संसार’ ही मालिक प्रचंड गाजली. त्यानंतर तिने बऱ्याच हिट मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. तसंच तिने ‘गली बॉय’, ‘धमाका’, ‘चोक्ड’ (Choked) यांसारख्या चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिची ‘गली बॉय’मधील भूमिका खूप गाजली होती. तर झी मराठीचा ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय ठरताना दिसत आहे. सेलिब्रेटींसह राजकीय क्षेत्रातील नामवंत महिलांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan wrote love latter to amruta subhash actress open up about it on bus bai bus chat show mrj