बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. आता इराने १५ दिवस उपावस केल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. इराने उपवास का केला? त्यामागे कारण काय? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने, ‘मी वजन कमी करण्याची सुरुवात करण्यासाठी १५ दिवस उपवास केला. माझे सेल्फ मोटिव्हेशन आणि सेल्फ इमेज डिपार्टमेंटमध्ये इतके चांगले काम करत नाहीये. मी माझ्या आयुष्यात खूप काही करत असते पण गेली ४ ते ५ वर्षे मी काही केलेले नाही. मी २० किलो वजन वाढवले आहे. आणि आता मला त्याचा त्रास होत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : माझी तुझी रेशीमगाठ : नेहाला मनवण्यात यश होईल का यशस्वी?

पुढे ती म्हणाली, ‘मी आजपर्यंत खूप असे वजन कमी केलेले नाही. पण आज मला नवी प्रेरणा मिळाली आहे. मी खूप विचार केला.’ या पोस्टसोबतच इराने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. सध्या सोशल मीडियावर इराची ही पोस्ट चर्चेत आहे.

लॉकडाउनदरम्यान इरा आणि नुपूर यांच्यातल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आले होते. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला होता. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली होती.