बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी इरा पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. शॉर्ट्स घातल्याने इराला ट्रोल व्हावं लागलं असून काही युजर्सनी आमिर खानविरोधात फतवा काढण्याची मागणी केली आहे. आमिर खान आणि इराला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही एकदा दोघांना सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होतं.
आमिर खानचा मुलगी इरासोबतचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत इराने शॉर्ट आणि स्लीव्हलेस नेकटॉप घातला असलेला दिसत आहे. दोघेजण फोटोग्राफर्साठी पोझ देताना दिसत असून दुसऱ्या फोटोत एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत.
View this post on Instagram
My daddy the best #irakhan #aamirkhan at @miacucinaindia brunch @viralbhayani
या फोटोत इराने घातलेल्या कपड्यांवर काहीजणांनी आक्षेप घेत तिच्यावर टीका केली आहे. इरा अंगप्रदर्शन करत असल्याचा आऱोप करत काहीजणांनी तिच्या छोट्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. काहीजणांनी तर थेट इराविरोधात फतवा काढण्याची भाषा केली आहे. एकीकडे इराला ट्रोल व्हावं लागलं असताना काहीजणांनी मात्र तिचं कौतुक केलं आहे.