काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पीके’ चित्रपटाचा पोस्टर सध्या बॉलीवूडचा चर्चेचा विषय बनला आहे. नग्न अवस्थेत असलेल्या आमिरच्या या पोस्टरला सर्वांकडूनच संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. त्याच्या या पोस्टरवर शाहरुखने तर कोपरखळी उडवलेलीच पण आता राजकीय नेतेही मागे हटलेले नाहीत. काँग्रेसचे आमदार कृष्णा हेगडे यांनी त्या पोस्टरला चक्क कपडेच घातले.
आमिर एक चांगला अभिनेता असून त्याने ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचे हे पोस्टर भारतीय संस्कृतीला साजेसे नाही. ते कोणालाचं पसंत पडणारे नाही. त्याला आदर्श मानणा-या तरुणांवर आणि कुटुंबावर या पोस्टरद्वारे वाईट छाप उमटली जातेयं., असे हेगडे शनिवारी कार्यक्रमादरम्यान म्हणाले. नग्नतेचे प्रदर्शन करणारे सदर पोस्टर हटवले जावे असेही त्यांनी आमिरला सुचविले आहे. पण काही दिवसांपूर्वी आमिरला म्हणाला होता की, या पोस्टरच्या माध्यमातून निव्वळ प्रसिद्धी साधण्याचा आपला कोणताही हेतू नाही. ‘पीके’ या चित्रपटाचा मुळ गाभा या पोस्टरमध्ये दडला असून, चित्रपटाच्या दृष्टीकोनातून या पोस्टरमध्ये साकारण्यात आलेली कलाकृती महत्वाची आहे.  प्रेक्षकांनी हा चित्रपट बघितल्यानंतरच त्यांना या पोस्टरमागील खरी संकल्पना लक्षात येईल.

Story img Loader