बॉलीवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खानच्या ‘पीके’ चित्रपटाचा पोस्टर त्याच्या नग्नावस्थेतील ‘लूक’मुळे चर्चेचा विषय ठरत असला तरी हे पोस्टर हॉलीवूडची नक्कल असल्याची चर्चा आता नेटिझन्समध्ये रंगली आहे.
आमिर खानच्या पोस्टरविरुद्ध याचिका
‘पीके’चे पोस्टर पोर्तुगीज गायक क्युम बेर्रियरयस याच्या अल्बमकव्हरशी साधर्म्य साधणारे आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या या पोस्टरमध्ये ‘पीके’च्या क्रिएटीव्ह टीमचा स्वत:चा असा काहीच वेगळेपणा नसल्याच्या प्रतिक्रिया नेटिझन्समध्ये व्यक्त होत आहेत. पोर्तुगीज गायक क्युमच्या अल्बमकव्हर सारखेच ‘पीके’च्या पोस्टरमध्ये आमिर खान नग्नावस्थेत दिसतो आहे. फरक इतकाच की, पोर्तुगीज गायक पोस्टरवर पियानो घेऊन उभा असल्याचे दिसते तर आमिरच्या हातात रेडिओ आहे.
आमिरच्या चित्रपटाचे पोस्टर हॉलीवूडच्या चित्रपटांशी साधर्म्य साधणारे असल्याची ही पहिलीच वेळ नाही. मागीलवर्षी प्रदर्शित झालेला ‘धूम-३’ या चित्रपटाचे पोस्टर हॉलीवूड चित्रपट ‘द डार्क नाइट’ या चित्रपटाशी साम्य साधणारे होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा