आमिर खानचा ‘पीके’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक धार्मिक संघटनांच्या टीकेचा आणि एकुणच वादाच्या केंद्रस्थानी होता. मात्र, या सगळ्यावर मात करत या चित्रपटाने जगभरात तब्बल ६११ कोटींची कमाई करत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला. देव आणि धर्माबद्दल एका परग्रवासीयाच्या नजरेतून विचार मांडणाऱ्या ‘पीके’ या चित्रपटाला प्रदर्शनापासूनच कट्टर हिंदुत्ववादी संघटनांच्या टीकेचा धनी व्हावे लागले होते. मात्र आमिर खान, संजय दत्त, अनुष्का शर्मा, सुशांत सिंग राजपूत, बोमन इराणीसारख्या कलाकारांची भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विक्रमी कमाई केली. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पीकेने बॉक्स ऑफिसवर ६.८५ कोटी आणि आठवडा संपता संपता ११.५० कोटींची कमाई केली होती. तेव्हाच हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा ओलांडणार , अशी भाकिते या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविण्यात येत होती. या सर्व अपेक्षा सार्थफक्त १७ दिवसांत ३०५.२७ कोटींची कमाई करणारा हा पहिलाच हिंदी चित्रपट धार्मिक भावना दुखावल्याचे सांगत अनेक हिंदू संघटनांनी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने पीकेमध्ये काहीही आक्षेहार्प नसल्याचे सांगत चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली होती. शाहरूख खान आणि सलमान खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेकजणांनी चित्रपटाचे खंबीरपणे समर्थन केले होते.
आमिर खानच्या ‘पीके’ची ६११ कोटींची विक्रमी कमाई!
आमिर खानचा 'पीके' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून अनेक धार्मिक संघटनांच्या टीकेचा आणि एकुणच वादाच्या केंद्रस्थानी होता.
आणखी वाचा
First published on: 11-01-2015 at 03:46 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khans pk breaks all records grosses rs 611 crore worldwide