मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानच्या ‘पीके’ने केवळ दोन दिवसात ५० कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित आणि विधू विनोद चोप्राची निर्मिती असलेला ‘पीके’ शुक्रवारी प्रदर्शित झाला. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आर्थिक बाबींची जाण असलेल्या गिरीश जोहर यांनी ‘पीके’ने ५० कोटींपेक्षाही अधिक गल्ला जमावला असल्याचे ट्विट केले आहे. तसेच, ‘पीके’ हा या वर्षातील चौथा चित्रपट आहे ज्याने दोन दिवसात तिकीट बारीवर ५० कोटींपेक्षाही अधिक कमाई केली.
पहिल्याच दिवशी ‘पीके’ने  २६ कोटींच्यावर कमाई केली होती. दोन दिवसात या चित्रपटाने जवळपास ५५ कोटी कमावले असल्याचे मल्टिमिडीया कम्बाइन्सचे राजेश थाडानी यांनी सांगितले. या चित्रपटाची सर्वच स्तरातून वाहवा केली जात असून चित्रपट समीक्षकांनीही प्रशंसा केली आहे.

Story img Loader