आमीर खानच्या बहुचर्चित ‘पीके’ चित्रपटाने रविवारी ३०० कोटींचा गल्ला पार केला. त्याचसोबत या चित्रपटाची जगभराईतील कमाई ६०० कोटींच्या आसपास गेली आहे. जर ‘पीके’ने ६०० कोटींचा आकडा पार केला तर रेकॉर्डब्रेक कमाई करणारा हा पहिला बॉलीवूड चित्रपट ठरणार आहे.
१००, २०० आणि ३०० कोटींच्या क्लबवर आमिरचे नाव कोरले गेल्याचे आता स्पष्ट झाले आहे. चित्रपट समीक्षक कोमल नाहता यांनी काही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. आमिरचा हा तिसरा चित्रपट आहे ज्याचा रेकॉर्ड इतर चित्रपटांना तोडणे काहीसे कठीणचं आहे. राजकुमार हिराणीसोबत आमिरने केलेला ‘३ इडियट्स’ हा २०० कोटींचा गल्ला जमविणारा पहिला चित्रपट होता. तर मुरुगदाससोबतचा ‘गजिनी’ हा १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा पहिला चित्रपट होता. आमीरच्याच ‘धूम-३’ चित्रपटालाही मागे टाकत ‘पीके’ हिंदी चित्रपटांच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Story img Loader