आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटाने केवळ भारतातचं नाही तर उत्तर अमेरिकेतील प्रेक्षकांवरही जादू चालवली आहे. राउटर्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’ हा डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत पोहचला आहे. या यादीत ‘द हॉबिटः द बॅटल ऑफ द फाइव्ह’ आर्मिज हा पहिल्या स्थानावर असून पीकेने दहावे स्थान पटकाविले आहे. ‘पीके’ने आतापर्यंत ३५ लाख डॉलर्स इतकी कमाई केली आहे.
स्थानिक पातळीवर या चित्रपटाने समीक्षक आणि प्रेक्षकांची प्रशंसा मिळविली असून पहिल्या दोन दिवसात ५५ कोटींच्यावर गल्ला जमविला.

१. द हॉबिट- ५६.२ लाख डॉलर्स
२. नाइट अॅट द म्युझियम- १७.३ लाख डॉलर्स
३. अॅनी- १६.३ लाख डॉलर्स
४. एॅक्झॉडसः गॉड्स अॅण्ड किंग्स- ८.१ लाख डॉलर्स
५. द हन्गर गेम्स- मॉकिंग्जय पार्ट १- ७.८ लाख डॉलर्स
६. वाइल्ड- ४.२ लाख डॉलर्स
७. टॉप फाइव्ह- ३.६ लाख डॉलर्स
८. बिग हिरो ६- ३.६ लाख डॉलर्स
९. पिन्जन्स ऑफ मादागास्कर- ३.५ लाख डॉलर्स
१०. पीके- ३.५ लाख डॉलर्स

‘पीके’ चा रिव्ह्यू आणि आमिरच्या चाहत्यांचे प्रेम पाहता हा चित्रपट अजून काही आठवडे तिकीट बारीवर आपली जादू नक्कीच चालवेल. तसेच, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलाचं गल्ला जमवेल यात शंका नाही.

Story img Loader