आमिर खानचा प्रसिद्ध कार्यक्रम ‘सत्यमेव जयते’चा दुसरा सिझन २ मार्चपासून सुरु होणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे देशातील सामाजिक समस्यांवर वादविवाद आणि चर्चा करण्यासाठी तसेच सामाजिक विषयांमध्ये लक्ष वेधण्यासाठी आमिरचे कौतुक करण्यात आले होते. स्त्रीभ्रूणहत्या, भारतातील आरोग्य परिस्थिती आणि घरगुती हिंसा यांसारखे विषय कार्यक्रमाद्वारे पुढे आले. सत्यमेव जयते चा पहिला सिझन स्टार प्लस आणि दूरदर्शन वाहिनीवर दाखविण्यात आला होता. दुसरा सिझनदेखील याच वाहिन्यांवर दाखविण्यात येणार आहे. पहिल्या सिझनमध्ये १३ भागांच्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

Story img Loader