सामाजिक समस्यांविषयी जागरुकता पसरविण्याचा यापूर्वीचा आमिरचा प्रयत्न यशस्वी झाला. त्यामुळे आता आमिर पुन्हा ‘सत्यमेव जयते’चा दुसरा सिझन घेऊन येत आहे. आणि यावेळी काही तरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. या कार्यक्रमाचे एपिसोड टीव्हीवर वेगवेगळ्या हंगामात दाखविण्यात येणार आहे.
आमिरने नुकतीच याबाबत माहिती दिली. दुस-या सिझनचे एकूण १२ भाग असणार आहेत. त्यातील पहिले चार भाग एकाच महिन्यातील चार रविवारी दाखविण्यात येतील. त्यानंतर काही महिन्यांच्या अंतराने पुढील चार भाग दाखविण्यात येतील आणि उरलेले भाग वर्षाच्या शेवटी दाखविले जातील. यामागे आमिरचा हेतू आहे. तो म्हणजे, कार्यक्रमात चर्चा करण्यात येणारा विषय योग्यरित्या पार पडावा आणि त्यावर प्रेक्षकांनाही बारकाईने विचार करण्यासाठी वेळ मिळावा. मात्र, ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या तारखा अद्याप ठरविण्यात आलेल्या नाहीत.

Story img Loader