आपल्या आजूबाजूला दुसऱ्या कोणत्यातरी चित्रपटाचे चित्रिकरण चालू आहे हे कानावर आले तर तिथे सहज डोकोवून जायचे ही प्रथा मोठे कलाकार आवर्जून पाळतात. आमिर, सलमान आणि शाहरूख नेहमीच कुठल्या ना कुठल्यातरी सेटवर डोकावून जातात. यावेळी आमिर आणि ‘हमशकल’ची टीम अशीच एकत्र आली. साजिद खान दिग्दर्शित ‘हमशकल’ चित्रपटाचे चित्रिकरण बाजूलाच सुरू आहे ही गोष्ट आमिरच्या कानावर आली. आणि आपले चित्रिकरण संपल्यावर त्याने तिथे भेट द्यायचे ठरवले. आमिरच्या भेटीमुळे साजिदच्या ‘हमशकल’ची टीम एकदम आनंदली होती. सैफ अली खान, तमन्ना भाटिया, रितेश देशमुख, बिपाशा बसू आणि स्वत: साजिद सगळ्यांनीच खुच्र्या पकडून आमिरबरोबर गप्पांची मैफल जमवली. ‘अंगूर’चा रिमेक असलेला ‘हमशकल’ पूर्णपणे विनोदी चित्रपट असल्याने विनोदी गोष्टी आणि किस्से एकमेकांना ऐकवतच ही मैफल चांगलीच रंगली.

Story img Loader