तुर्कीमधील प्रेक्षणिय स्थळी चित्रीत करण्यात आलेला दिग्दर्शिका झोया अख्तरचा ‘दिल धडकने दो’ चित्रपट पाहिल्यानंतर तुर्की हा देश बघण्याची ओढ मनामध्ये निर्माण झाल्याचे आमीर खानने सांगितले.
रविवारी रात्री आमीरने दुस-यांदा या चित्रपटचा आनंद लुटला. यानंतर टि्वटरच्या माध्यमातून या चित्रपटाविषयीचे मत त्याने व्यक्त केले. अशाप्रकारचा सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल त्याने चित्रपटाची दिग्दर्शिका आणि लेखिका झोया अख्तर, रिमा कागतीसह संपूर्ण टीमचे कौतूक केले. तसेच, चित्रपटातील तुर्कीचे चित्रीकरण पाहिल्यानंतर या देशाला भेट देण्याची उत्सूकता निर्माण झाल्याचे त्याने सांगितले. चित्रपटात फरहान अख्तर, अनिल कपूर, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोप्रा आणि शेफाली शाहा या कलाकारांनी अभिनय केला आहे.

Story img Loader