बाबा अभिषेक आणि आई ऐश्वर्या राय बच्चनने आपली लाडकी परीराणी आराध्याचा वाढदिवस प्रतिक्षा बंगल्यावर धुमधडाक्यात साजरा केला. १६ नोव्हेबरला आराध्या दोन वर्षांची झाली. प्रतिक्षा बंगल्यात आराध्याच्या बर्थडे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी संपूर्ण बंगला परीराणीच्या कथेतील राजवाड्याप्रमाणे सजवण्यात आला होता. बंगल्यात फुगे लावण्यात आले होते आणि आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असलेली सीबीज्, टेलिट्युबीज्, टिंकरबेल अशी विविध कार्टुन कॅरेक्टर्स आणि विविध रंगी फुलपाखरांचे मोठे कटाऊटस् संपूर्ण बंगल्यात उभारण्यात आले होते. त्याचप्रमाणे बुडबुडे सोडणारे मशिनसुद्ध बसविण्यात आले होते. या सर्वाची मुलांनी खूप मजा लुटली. आपल्या परीराणीच्या वाढदिवसाची तयारी आई ऐश्वर्याने स्वत: लक्ष देऊन केली होती. चॉकलेट आणि कॅन्डीने भरलेल्या एका बकेटमधून या वाढदिवसाची खास निमंत्रण पत्रिका लहानग्यांना पाठविण्यात आली होती.
पार्टीला हृतिकची मुले रेहान आणि रिधान आपल्या सुपर हिरो डॅडसोबत आले होते. आई काजोलबरोबर न्यासा आणि युग देवगणने पार्टीला उपस्थिती लावली होती. छोटी सायरा मम्मी लारा दत्ताबरोबर, आझाद खान मॉम किरण रावबरोबर तर विआन बाबा राज कुंद्रा आणि आई शिल्पा शेट्टीबरोबर आला होता.
फॅशन फोटोग्राफर डब्बू रत्नानी आपल्या तीन मुलांना घेऊन बर्थडे पार्टीला हजर होता. आराध्याच्या बर्थडे पार्टीत सर्व लहान दोस्तांनी धमालमस्ती केली. पार्टीच्या शेवटी बच्चेकंपनीतील प्रत्येकाला रिटर्न गिफ्टी मिळाल्याची खातरजमा ऐश्वर्या करीत होती.

Story img Loader