बॉलीवूडचे बहुतेक कलाकार नववर्ष साजरे करून भारतात परतले आहे. यामध्ये बॉलीवूडच्या बहुचर्चित बच्चन कुटुंबाचाही समावेश आहे.  
ऐश्वर्या राय, तिचा पती अभिषेक बच्चन आणि मुलगी आराध्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दुबईला गेले होते. त्यानंतर ते आता भारतात परतले आहेत. घरी परतलो, कामालाही सुरुवात केली आहे, संस्मरणीय अशा नवीन वर्षाच्या सुरुवातीकरिता दुबईचे आभार, या शब्दात अभिषेकने ट्विट केले आहे. तसेच बिग बीदेखील नात घरी परतल्यामुळे फार खूष आहे. त्यांनीही सर्वांच्या घरी परतण्याचा आनंद ट्विटरवर व्यक्त केला आहे.

Story img Loader