बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे. आराध्याने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आराध्याला K-Pop स्टार लीसा सारखी दिसते असे म्हणतं आहेत. आता तिचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आराध्या हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे असं सांगते. हा संपूर्ण व्हिडीओ पाहिल्यानंतर आराध्याचं हिंदी भाषेवरील प्रभुत्व पाहून लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. आराध्या बच्चनचा हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवर असलेल्या फॅन पेज अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा : “प्रसिद्ध व्यावसायिकाने मला त्याच्या पत्नीसोबत रात्र…”, तेहसीन पुनावालाने केला धक्कादायक खुलासा

आणखी वाचा : अमिताभ यांच्या ‘झुंड’ चित्रपटावरून कपिल शर्मा वादाच्या भोवऱ्यात, निर्मात्यांनी केलं वक्तव्य

आणखी वाचा : डोंबिवली स्थानकात जोडप्याचा किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल; नेटिझन्सने व्यक्त केली नाराजी

हा व्हिडीओ आराध्याच्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतील आहे. तर ट्विटरवर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिचे भाषेवर असलेले प्रभुत्व हे आजोबा अमिताभ आणि पंजोबा हरिवंश राय बच्चन यांच्यामुळे असल्याचे म्हटले आहे. हरिवंश राय हे एक लोकप्रिय कवी आणि अमिताभ बच्चन यांचे वडील आहेत. या शिवाय अभिषेक बच्चनने हात जोडण्याचे इमोटीकॉन वापरत कमेंट केली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaradhya bachchan new video of reciting poem in shudh hindi goes viral netizens react dcp