बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन त्यांच्या चाहत्यांना जलसा या बंगल्यावर नेहमी भेट देतात. १८ महिन्यांच्या आराध्याला चाहत्यांच्या भेटीस नेऊन अमिताभने चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. छोट्याशा आराध्येची लोकप्रियता पाहून अमिताभ स्वतः चकित झाले. अमिताभ यांनी फेसबुकवर आराध्याची दोन छायाचित्रे पोस्ट केली होती. या दोन्ही छायाचित्रांना केवळ तीन दिवसांमध्ये दोन लाखांच्यावर लाइक्स मिळाले आहेत. “आराध्याच्या छायाचित्रांना फेसबुकवर मिळालेली पसंती ही तिच्या आजोबांच्या सर्वाधिक लाईक मिळालेल्या छायाचित्रापेक्षा तीनपटीने जास्त आहे.”, असे अमिताभ यांनी फेसबुकवर म्हटले आहे.

Story img Loader