बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि पती अभिषेक बच्चन यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना एक मुलगी असून तिचं नावं आराध्या आहे. आराध्याने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नाही तरी देखील तिची लोकप्रियता कोणत्या कलाकारापेक्षा कमी नाही. काही दिवसांपूर्वी आराध्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
आराध्याचा व्हायरल झालेला हा फोटो तिच्या फॅन अकाऊंटवरून शेअर केला आहे. आराध्या जवळपास ५ ते ६ वर्षांची असतानाचे हे फोटो आहेत. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अमिताभ यांच्यासोबत आराध्या पकडापकडी खेळताना दिसत आहे. यात आराध्या पुढे धावत असून अमिताभ तिच्या मागे धावत आहेत. आराध्या आणि अमिताभ यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तर त्यांचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
आराध्याच्या व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, हृदयाला स्पर्श केला. या आधी आराध्याचा हिंदी भाषण देतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिचे हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व पाहिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य झाले होते. आराध्याचे बरेच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.