एश्वर्या आणि अभिषेक बच्चन या आपल्या आई-वडिलांपेक्षा बेबी आराध्या माध्यमांमध्ये आकर्षणाचा विषय असून, आई-वडिलांपेक्षा अधिक प्रमाणात ती प्रसिध्दीच्या झोतात असते. दुबईतील सुट्टी संपवून परतलेल्या बेबी आराध्या आणि आई एश्वर्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींनी झुंबड केली होती. आराध्याला नटण्याची आवड असून, गुलाबी रंगाची प्रिंट असलेले जॅकेट, गुलाबी शूज आणि गुलाबी हेअर-पीन असा तिचा मॅचिंग पोषाख होता. अलिकडेच तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दिसायला आपल्या वडिलांसारखी असलेल्या आराध्याने रंग मात्र आईचा घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aaradhya bachchan with mommy aishwarya at airport
Show comments