बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या आजारी असून, आराम करत आहेत. आपल्या या आजारी आजोबांची काळजी छोट्याश्या आराध्यालासुध्दा वाटते. त्यामुळेच ती आपल्या बोबड्या भाषेत आजोबांच्या तब्बेतीची विचारपूस करते. आपल्या तब्बेतीची चौकशी करण्यासाठी आलेली आराध्या पाहून आजोबांना खूप आनंद होतो. अमिताभ बच्चन आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात, छोटी आराध्या जीना चढून माझ्या खोलीत येते आणि आपल्या बोबड्या बोलीत माझ्या प्रकृतीची विचारपूस करते.
या १६ नोव्हेंबरला आराध्या २ वर्षाची होईल. अमिताभ पुढे म्हणतात, मी जास्तीत जास्त आराम करण्याचा प्रयत्न करत आहे. दिवसभर माझ्या आराम खुर्चीवर बसून असतो. क्रिकेट पाहण्यात दिवस चांगला जातो. न टाळता येण्यासारख्या महत्वाच्या गाठीभेटी घेतो.
आणखी चार दिवसात अमिताभ बच्चन यांची तब्बेत सुधारेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. ते म्हणतात, औषधांचा डोस वाढवला असून, ती आणखी प्रभावशाली करण्यात आली आहेत. लवकरच पुन्हा कार्यरत होण्याची मी आशा करतो. यासाठी आणखी चार दिवसांच्या कालावधीचा आंदाज वर्तवला जात आहे.
‘कौन बनेगा करोडपती – ७’च्या चित्रिकरणात व्यस्त असलेले अमिताभ बच्चन ताप आणि पोटाच्या संसर्गामुळे त्रस्त आहेत. असे असले तरी त्यांच्या या प्रकृती अस्वास्थाचा त्यांनी कामात अडथळा येऊ दिला नाही आणि कौन बनेगा करोडपतीसाठीचे काम करत राहिले.
काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘जब तक जीवन है तब तक संघर्ष है’ हा संदेश ट्विट केला होता. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ‘माझ्या शरीरात त्राण अहेत तिथवेरी मी काम करीत राहीन’ असे पत्रकारांना सांगितले होते

Story img Loader