प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम ३’ ही वेबसीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा पाखंडी ‘बाबा निराला’च्या भूमिकेत दिसत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तिसऱ्या भागात बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन आहेत. विशेष म्हणजे या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे. त्यातील ईशा गुप्ता आणि बॉबी देओल यांच्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. तसं तर ईशा गुप्ता आपल्या बोल्ड फोटो आणि विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. पण आता एका मुलाखतीत लिंगभेद आणि बॉडी पॉझिटिव्हीटी याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
‘जन्नत २’, ‘राज थ्री डी’, ‘चक्रव्यूह’, ‘बेबी’, ‘रुस्तम’, ‘टोटल धमाल’ यांसारख्या चित्रपटातील बोल्ड भूमिकांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली ईशा गुप्ता सध्या तिची वेब सीरिज ‘आश्रम ३’मुळे चर्चेत आली आहे. या वेब सीरिजमध्ये ईशानं सोनिया ही दमदार आणि बोल्ड व्यक्तिरेखा साकारली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिची वेब सीरिज, बोल्डनेस, सेक्शुअिटी, ट्रोलिंग, बॉलिवूडमध्ये चांगले चित्रपट न मिळणे आणि महिलांच्या समस्यांवर भाष्य केलं आहे.
आणखी वाचा- व्हायरल इंटीमेट फोटो ते विवाहित अभिनेत्याशी अफेअर, वादग्रस्त कारणांनी चर्चेत राहिली नयनतारा
ईशाला जेव्हा तिचा बोल्डनेस आणि त्यावरून होणाऱ्या ट्रोलिंगविषयी विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, “आपल्या देशात हीच समस्या आहे ती स्त्रियांना नेहमीच जज केलं जातं. त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं गेलं तर त्यांनाच ‘तू तिथे गेलीसच का?’ असा प्रतिप्रश्न केला जातो. जर पुरुषांनी शरीर दाखवलं, शर्टलेस फोटो शेअर केले तर त्यांना कुणीच काही बोलत नाही पण जर स्त्रियांनी असं केलं तर मात्र त्यांच्यावर टीका केली जाते. मला वाटतं याबाबत आपल्या देशातील लोकांचे विचार बदलणं गरजेचं आहे. आपल्या देशात नेहमीच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो. पण प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे जगण्याचा हक्क असायला हवा.”
आणखी वाचा- “तर मग शो बंद करा…” ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर भडकले चाहते
याशिवाय ‘आश्रम ३’मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली?’ या प्रश्नाचं उत्तर देताना ईशा म्हणाली, “हा खूपच रंजक किस्सा आहे. दुसऱ्या लॉकडाऊनच्या वेळी माझ्या आई-बाबांसोबत दिल्लीमध्ये होते. त्यावेळी मी मेरठला एका कार्यक्रमासाठी गेले होते आणि तिथे प्रत्येकजण या वेबसीरिजबद्दल बोलत होता. ‘आश्रम’च्या बातम्या छापून आल्या होत्या. त्यानंतर मी ११-१२ दिवासांनी परदेशात गेले होते आणि प्रकाश झा सरांचा मला फोन आला की ‘आश्रम ३’बद्दल त्यांना माझ्याशी बोलायचं होतं. मला विश्वासच बसत नव्हता की काही दिवसांपूर्वीच मी या वेब सीरिजचा भाग असते तर असा विचार करत होते आणि मला याच शोसाठी विचारलं जात होतं.”