प्रकाश झा बॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. आपल्या चित्रपटातून ते राजकीय सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना दिसून येत असतात. आपली मतं देखील ते ठामपणे मांडत असतात. मध्यन्तरी त्यांनी अभिनयावरून बॉलिवूडमधील कलाकारांवर टीका केला होती. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा त्यांनी टीका केली आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच चित्रपटावर टीकेची झोड उठली होती. त्यात बॉयकॉट हॅशटॅग प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्याने चित्रपटाला याचा फटका बसला आहे.
दिग्दर्शक प्रकाश झा यांनी सिनेस्टान यांच्याशी बोलताना आपले मत मांडले. ते म्हणाले की चित्रपट ‘चांगला असेल तर तो चालेल. चित्रपट उद्योगासाठी हा एक प्रकारचा धडा आहे. त्यांना समजायला हवे की ते मूर्खपणा करत आहेत. केवळ पैसे आणि कलाकारांना जास्त पैसे देऊन चित्रपट बनवता येत नाहीत. एक अशी कथा लिहायला हवी जी सर्वप्रथम आपल्याला कळेल आणि आपले मनोरंजन करेल’. बॉलिवूड चित्रपटांवर ते पुढे म्हणाले, ‘त्यांनी अशा कथा बनवल्या पाहिजेत ज्या लोकांशी संबंधित असतील. हिंदी चित्रपटसृष्टीतील लोक हिंदीतमध्ये बोलतात मात्र बनवतात काय तर रिमेक? जर तुमच्याकडे सांगण्यासारखी कथा नसेल तर चित्रपट बनवणे बंद करा.
ललित मोदी-सुष्मिता सेन यांचा ब्रेकअप, सोशल मीडियावरील बदलामुळे चर्चांना उधाण
‘चित्रपट निर्मात्यांनी आता मेहनत घेण्याची गरज आहे. अखेर प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल, याचा विचार त्यांना करावा लागेल. बॉयकॉटच्या मुद्दयावर देखील त्यांनी आपले मत मांडले ते म्हणाले की, हा प्रकार काही नवा नाही’, आता सोशल मीडियामुळे जास्त सक्रिय झाला आहे. प्रकाश झा सध्या ‘मट्टो की सायकल या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान ते ठिकठिकाणी फिरत आहेत.
दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आजवर ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ सारखे चित्रपट बनवले आहेत. त्यांची ‘आश्रम’ वेबसिरीज चांगलीच गाजत आहे. ‘गंगाजल २’, ‘सांड की आंख’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयदेखील केला आहे. प्रकाश झा मूळचे बिहारचे आहेत. तीन दशकाहून अधिक ते चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.