प्रकाश झा दिग्दर्शित ‘आश्रम ३’ ही वेबसीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेअरवर प्रदर्शित झाली आहे. अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा पाखंडी ‘बाबा निराला’च्या भूमिकेत दिसत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. तिसऱ्या भागात बरेच बोल्ड आणि इंटिमेट सीन आहेत. विशेष म्हणजे या सीझनमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातील ईशा गुप्ता आणि बॉबी देओल यांच्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ईशाने हे सीन शूट करताना आलेला अनुभव सांगितला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बॉलिवूड लाईफ’शी बोलताना ईशा गुप्ता म्हणाली, “असे सीन करताना कम्फर्टेबल असण्याची किंवा नसण्याचा काही प्रश्न नाही. जेव्हा तुम्ही १० वर्षं या क्षेत्रात काम करत असता तेव्हा असे सीन शूट करताना तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती किंवा शंका नसते. मोठ्या पडद्यावर इंटिमेट सीन बऱ्याच लोकांना खूप मोठी गोष्ट वाटते. पण याबाबतीत मी खूप मोकळ्या विचारांची व्यक्ती आहे.”

ईशा गुप्ताच्या मते, पडद्यावर दुःखी असलेलं किंवा रडत असलेलं दाखवणं किंवा त्याचा अभिनय करणं खूप कठीण असतं. ती म्हणाली, “जेव्हा मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला इंटिमेट सीन दिले तेव्हा माझ्यासाठी ते कठीण काम होतं. पण आता असं नाहीये. जेव्हा तुम्ही चांगल्या आणि समजदार व्यक्तींसोबत काम करता तेव्हा कोणतीही समस्या येत नाही. आता चित्रपट आणि ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या इंटिमेट सीनमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे असे सीन करताना तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं आहे.

‘आश्रम ३’मध्ये ईशा गुप्ता एका बिल्डरच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या व्यक्तिरेखेचं नाव सोनिया आहे. वेब सीरिजमध्ये ती आपल्या स्वार्थासाठी ‘बाबा निराला’ म्हणजेच बॉबी देओलशी जवळीक साधताना दिसत आहे. वेब सीरिजमधील ईशा गुप्तच्या बोल्ड आणि ग्रे शेड व्यक्तिरेखेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aashram 3 esha gupta reacts on bold and intimate scene with bobby deol mrj