बिग बॉस मराठीचा पहिला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सहा स्पर्धकांमध्ये गेल्या आठवड्यापासून चढाओढ दिसत असून प्रेक्षकांकडून बरेच अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. अशातच ग्रँड फिनालेपूर्वी शर्मिष्ठा राऊत बाद झाल्याची माहिती समोर आली. आता शर्मिष्ठानंतर आस्ताद काळे आणि सई लोकूरसुद्धा घराबाहेर पडणार असल्याचं समजतंय.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार आस्ताद आणि सईसुद्धा बाद होणार असून अंतिम लढत ही मेघा धाडे, पुष्कर जोग आणि स्मिता गोंदकर यांच्यामध्ये रंगणार आहे. या तिघांपैकी विजेतेपद कोण पटकावणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Bigg Boss Marathi: या पाच कारणांसाठी ‘बिग बॉस मराठी’चा ग्रँड फिनाले ठरणार खास

सई विजेती ठरू शकते असा अंदाज सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून व्यक्त करण्यात येत होता. मात्र सईला मेघाकडून जबरदस्त टक्कर होती. सईच्या तुलनेत मेघाची लोकप्रियता बरीच वाढली आहे. त्यामुळे आता सईनंतर मेघा यात बाजी मारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Story img Loader