‘डीजे वाले बाबू…’ या गाण्याने संपूर्ण देशाला आपल्या तालावर नाचवणारी सुप्रसिद्ध गायिका आस्था गिलने खूप कमी वेळेत चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. तिचं प्रत्येक गाणं रिलीज होताच तरूणांच्या फेवरेट लिस्टमध्ये सामिल होत असतं. गायिका आस्था गिल लवकरच टीव्ही रिअ‍ॅलिटी शो ‘खतरों के खिलाड़ी 11’ मध्ये खतरनाक स्टंट करताना दिसून येणार आहे. नुकतंच ती केपटाउनवरून भारतात परतलीय. यासोबतच नुकतंच तिचं ‘पाणी पाणी’ हे गाणं रिलीज झालंय. हे गाणं रिलीज झाल्यानंतर यूट्यूबवर या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अशातच गायिका आस्था गिलने स्वतःला नशीबवान असल्याचं म्हटलंय. याचं कारण देखील तिने शेअर केलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आस्थाने सुप्रसिद्ध रॅपर बादशाहसोबत अनेक जबरदस्त गाणे गायले आहेत. ‘डीजे वाले बाबू’, ‘व्हिडियो बना दे’, ‘नागिन’ आणि ‘कामरिया’ सारखे तिने आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणे दिले आहेत. इतकंच नव्हे तर तिच्या ‘क्रेजी लेडी’ या गाण्याला यूट्यूबवर ९ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

“स्वतंत्र संगीत विकसीत होत असलेल्या आणि गती पकडत असलेल्या अशा युगात काम करायला मिळतंय म्हणून मी स्वतःला खूप नशीबवान समजतेय” , असं गायिका आस्था गिलनं म्हटलंय. तसंच सध्याच्या काळात ज्याप्रमाणे संगीत विकसीत होऊ लागलंय, त्याचप्रमाणे दर्शकांची पसंती देखील दिवसेंदिवस बदलत चालली आहे. जगभरात काय चाललंय हे सुद्धा लोकांना माहितेय. संगीत काय आहे, ते कसं बनतं हे सारं लोकांना माहितेय. म्हणूनच कदाचित नव्याने लोक संगीत शिकू लागले आहेत. म्हणनूच या बदलत्या संगीताच्या युगात मला काम करण्याचं भाग्य मिळाल्यानं स्वतः नशीबवान समजतेय, असं देखील आस्था गिलने म्हटलंय.

नुकतंच गायिका आस्था गिल आणि रॅपर बादशाहने गायलेलं ‘पानी पानी’ या गाण्याने 130 मिलियनचा आकडा पार केलाय. या गाण्यात राजस्थानी संगीत वाद्ययंत्र रावणहट्टा आणि कलबेलिया लोक नृत्य यांची सांगड घालत हे गाणं तयार करण्यात आलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aastha gill feels lucky to her self prp