सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्यानं सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत त्याच्या बहिणीचा पती आयुष शर्मा देखील दिसणार होता. पण आता मात्र असं होणार नाहीये. आयुष शर्मानं ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट सोडला आहे. यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदा ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. त्यानंतर पुन्हा एकदा हे दोघं ‘कभी ईद कभी दिवाली’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असं बोललं जात असतानाच आयुष शर्मा आता या प्रोजेक्टचा भाग नसल्याची माहिती समोर येत आहे. काही रिपोर्टनुसार सलमान आणि आयुष यांच्यात काही मतभेद असल्यानं आयुषनं या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रोडक्शन हाऊसच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘कभी ईद कभी दिवाली’च्या टीमने अगोदरच चित्रपटासाठी काम आणि शूटिंग सुरू केलं होतं.

आणखी वाचा- “पृथ्वीराज चौहान राजपूत सम्राट नाही…” गुर्जर संघटनेच्या दाव्यामुळे अक्षय कुमारचा चित्रपट वादात

दरम्यान आता आयुष शर्मा आणि सलमान खान फिल्म्स यांच्यात काही मुद्द्यांवरून वाद झाल्यानं आयुष शर्मानं या चित्रपटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. आयुष्यानं या चित्रपटाच्या काही भागाचं शूटिंग देखील पूर्ण केलं होतं. पण आता तो या चित्रपटात दिसणार नाहीये.

आणखी वाचा- Cannes 2022 : कान्स चित्रपट महोत्सवाला अमृता फडणवीस यांची हजेरी, फोटो शेअर करत म्हणाल्या…

सलमान खानच्या ‘कभी ईद कभी दिवाली’ चित्रपटात पूजा हेगडे, राघव जुयाल आणि तेलुगू अभिनेता वेंकटेश दग्गुबाती यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचं शूटिंग मुंबईच्या विलेपार्ले येथील एका सेटवर सुरू झालं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ३१ डिसेंबर २०२२ ला प्रदर्शित होणारआहे.

Story img Loader