लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेने जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पैशी लग्न गाठ बांधली. त्यांनी गेल्या वर्षीच एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. पण त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होतं नाही तेवढ्यात मेहुलला कर्करोगाचं निदान झालं आणि जणू काही त्यांचं संपूर्ण आयुष्य हे अचानक बदललं. मेहुलवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरू आहेत. मेहुल आता ठीक असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिज्ञाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दिली आहे.
अभिज्ञाने इन्स्टाग्राम लाइव्हच्या मदतीने चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी मेहुलच्या कॅन्सरबद्दल बोलताना अभिज्ञा भावूक झाली. या लाइव्हमध्ये अभिज्ञाच्या एका चाहत्याने तिला घरचे कसे आहेत? असा प्रश्न विचारला. यावर भावूक होतं अभिज्ञा म्हणाली, “मी काही महिन्यांनंतर इन्स्टाग्रामवर लाइव्ह येण्याचा निर्णय घेतला, कारण मी माझ्या वैयक्तिक समस्यांमध्ये व्यस्त होते. मला बरं वाटत नव्हतं पण आता मला वाटतं की मी ठीक आहे.”
आणखी वाचा : १ एप्रिल पासून या ५ राशीचे बदलणार भाग्य, मिळणार लक्ष्मी मातेचा आशीर्वाद
पुढे मेहुलच्या प्रकृतीविषयी विचारल्यावर मेहुल म्हणाली, “तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीसाठी तुमचे आभार. घरी सर्वजण ठीक आहेत. मेहुलसुद्धा ठीक आहे. मेहुल बरा होत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कदाचित एक-दोन महिन्यांत तो पूर्णपणे बरा होईल. माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर मला तुमच्या प्रेमाची गरज आहे.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून जाणून घ्या तुमचे व्यक्तीमत्त्व
अभिज्ञा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सध्या ‘तु तेव्हा तशी’ या मालिकेत पुष्पावल्ली ही नकारात्मक भूमिका साकारतेय. या मालिकेत स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळस्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत.