झी मराठीवर ‘किचन कल्लाकार’ हा कुकरी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या कुकरी शोचे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मुख्यमंत्रीच नाही तर तर स्वतःला भावी पंतप्रधान आणि राष्ट्रपती पदाचे दावेदार समजणारे अभिजीत बिचुकलेने यावेळी हजेरी लावली होती. यावेळी बिचुकलेने अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयी एक विधान केले आहे.
आणखी वाचा : मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान अक्षया नाईकच्या पायाला दुखापत व्हिडीओ शेअर करत, म्हणाली…
आजच्या भागात अभिजित बिचुकलेसोबत अभिनेता जयवंत वाडकर आणि तृप्ती देसाई पाहायला मिळणार आहेत. या तिघांमध्ये पाककलेची चुरस रंगणार आहे. याच वेळी एका खेळा दरम्यान, अभिजीतसमोर डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो ठेवण्यात आला. तर ट्रम्प यांचा फोटो पाहताच बिचुकले म्हणाला, हे तर आमचे तात्या.. आमच्या गावाकडचे. अत्यंत हुशार आणि चांगला माणूस.’ हे ऐकल्यानंतर सेटवर उपस्थित असलेले सगळ्या लोकांना हसू अनावर झालं. बिचुकलेचे हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का?
या कार्यक्रमात केवळ कलाकारच नाही तर विविध क्षेत्रातील मंडळी हजेरी लावतात. विशेष म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्तीं या कार्यक्रमात येऊन धमाल करतात. राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या विविध बाजू या कार्यक्रमाने समोर आणल्या आहेत. जेवण बनवणे, खेळ खेळणे आणि पडद्यामागच्या गप्पांमधून थट्टा मस्करी करणे असा काहीसा या कार्यक्रमाचे स्वरूप आहे.