रायमा सेनचा अभिनय असलेला ‘खामोशियां’ हा लघुपट आपल्याला अभिनेत्री कंगना राणावतबरोबरच करायचा होता असा खुलासा नवोदीत दिग्दर्शक अभिजीत दास याने केला. या चित्रपटाबाबत दास खूप उत्सुक आहे. चित्रपटाची कथा कुत्र्यावर प्रेम करणा-या व्यक्तीच्या अवतीभोवती फिरते. दास म्हणाला, मी कंगनाबरोबर ‘लाइफ इन ए मेट्रो’ आणि ‘वो लम्हे’ हे चित्रपट केले आहेत. या चित्रपटात देखील कंगनानेच काम करावे अशी माझी इच्छा होती. श्वानप्रेमी कंगना त्यांच्या भावनांना अधिक चांगल्या प्रकारे समजत असल्याने चित्रपटातील या भूमिकेसाठी ती योग्य होती. परंतू, अनेक चित्रपटात व्यस्त असल्याने ती या चित्रपटासाठी उपलब्ध होऊ शकली नाही.
तो पुढे म्हणाला, मी रायमाला सुध्दा ओळखतो. रायमाने चित्रपटातील तिची भूमिका अतिशय चांगल्याप्रकारे साकारली आहे. पाळीव प्राणी आपल्या मालका प्रती अतिशय इमानदार आणि संवेदनशील असतात. मला आशा आहे की या चित्रपटाद्वारे लोक पाळीव प्राण्यांच्या प्रेम आणि निष्ठेला समजतील.
स्वत: दासकडे १५ कुत्रे आहेत, जे कुत्र्यांविषयीचे त्याचे प्रेम दर्शविते. भारतात लघुचित्रपटांसाठीचा प्रेक्षक वर्ग वाढत असल्याचे मत अनुराग बसुबरोबर ‘लाइफ इन ए मेट्रो’ आणि ‘बर्फी’ मध्ये काम केलेला दासने व्यक्त केले.
गेल्या महिन्यात हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा