‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेमुळे लोकप्रिय ठरलेला अभिनेता म्हणजेच चॉकलेट बॉय अभिजीत खांडकेकर. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांतून अभिजीतने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत अभिजीत प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिजीतने नुकतीच भार्गवी चिरमुलेच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बालपणीचे काही किस्से सांगितले. लहानपणी त्याच्या भाषेमुळे आणि दिसण्यामुळे त्याला न्यूनगंड वाटायचा असंही त्याने सांगितलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गप्पा, मस्ती आणि पॉडकास्ट विथ भार्गवी चिरमुले’ या यूट्यूब चॅनेलमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, “मी आधी बीड परभणीला होतो. नंतर सधारण पाचवी सहावीत आम्ही नाशिकला आलो. कारण बाबांना तेव्हा असं वाटत होतं की, आमचं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं. बीड-परभणीला मी बराच काळ घालवला, त्यामुळे माझे उच्चार, माझा लहेजा हा बऱ्यापैकी ग्रामीण होता. त्यात मी वयात येत असल्यामुळे माझा आवाज चिरकायचा, चेहऱ्यावर खूप पिंपल, अत्यंत बारीक दिसायचो मी. त्यामुळे आपण बरे दिसत नाही, आपला आवाज बरा नाही, आपल्याला नीट बोलता येत नाही असं मला वाटायचं. मला तेव्हा परभणीची भाकर म्हणून चिडवायचे.”

“तेव्हा तो काळच असा होता, कारण शुद्ध तुपाला पिवर तूप असं म्हटलं जायचं. मराठवाड्यातले काही उच्चार युनिक आहेत. आमच्या घरी अशी भाषा बोलली जायची. शहराकडे आल्यानंतर याच भाषेवर हसलं जायचं. मला असं झालं की, आपलं काहीचं बर नाहीय का? इंग्रजी माध्यमांमध्ये त्याकाळी पाचवीपासून एबीसीडी शिकवायचे. इंग्रजी येत नाही, हिंदी येत नाही, मराठी येतंय त्यावरही हसतायत आपल्याला सगळे, त्यामुळे मी खूप घाबरून गेलो होतो.”

हेही वाचा… चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोल झालेल्या प्राची निगमला ‘या’ अभिनेत्याने दिला पाठिंबा; पोस्ट शेअर करत म्हणाला, “मला तुझा अभिमान…”

“साधारण सातवी आठवीचा काळ माझ्यासाठी खूप वाईट होता. त्यावेळी मी शिकलो. सगळं वाचायला लागलो. तेव्हा मी ठरवलं होतं, आता मी माझी भाषा बदलूनच राहणार. हा भयंकर न्यूनगंड त्याकाळी माझ्यामध्ये काही काळ होता. मी आज जो काही आहे तो या गोष्टींमधून मी शिकलो म्हणून आहे, असं मला वाटतं.”

हेही वाचा… “….आणि बाबांकडे जावंस वाटतं”, बाबिल खानने इरफान खान यांचा उल्लेख करत शेअर केली भावुक पोस्ट

दरम्यान, अभिजीत सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गायकाची भूमिका साकारत आहे. या मालिकेत उर्मिला कोठारे, प्रिया मराठे, बालकलाकर अवनी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhijeet khandkekar shared childhood memory of being teased and self doubt dvr