मोहब्बतें लुटाऊंगा हे गाणं ऐकलं तरीही आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंत हे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे. अभिजीत सावंत हा इंडियन आयडल या अतिशय लोकप्रिय ठरलेल्या रिअॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचला. इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. मात्र त्याच्यासाठी हा प्रवास फार कठीण होता. नुकतंच त्याने त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. यामुळे त्याचे आयुष्य रातोरात बदलले होते. अभिजीत सावंतने यांनी त्याच्या जुन्या आठवणींबद्दल सांगितले आहे. अभिजीत सावंतने नुकतंच बीबीसीला मुलाखत दिली. यावेळी त्याने अनेक गोष्टींबद्दल खुलासा केला.
आणखी वाचा : “आर्थिक मंदीदरम्यान…” ‘इंडियन आयडल’ जिंकल्यानंतर मिळालेल्या पैशांबद्दल अभिजीत सावंतने केला खुलासा

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Ashok MaMa Colors Marathi New Serial
मुहूर्त ठरला! ‘अशोक मा.मा.’ मालिकेत झळकणार प्रसिद्ध अभिनेत्याची लेक अन् ‘कलर्स मराठी’ची लोकप्रिय नायिका, पाहा प्रोमो

यावेळी अभिजीत सावंत म्हणाला, “त्यावेळी मी साधारण २१ वर्षांचा होतो. माझे पदव्युत्तर शिक्षण घेत होतो. त्याबरोबर माझे गाणेही सुरु होते. त्यावेळी मला संगीत क्षेत्रात करिअर करायचे होतं. पण तेव्हा ते फार अवघड होतं. माझे आई-वडील संगीत क्षेत्रातील नसल्यामुळे मला तसं वाटत होतं.”

“त्यानंतर मी गणपती, नवरात्री या सारख्या कार्यक्रमात गाणी म्हणायला सुरुवात केली. छोट्या छोट्या सोसायटीमध्ये जाऊन मी माझे शो करायचो. त्यातून माझी थोडीफार कमाई व्हायची. यातून गाणं शिकण्यासाठी लागणाऱ्या फीचीही सोय व्हायची. त्यावेळी मी इतका प्रसिद्ध होईन, या उंचीवर जाईन असे अजिबात वाटत नव्हते.”

आणखी वाचा : “पण माझ्या डोक्यात हवा…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंत स्पष्टच बोलला

“मला आजही आठवतंय की मुंबईतील दादर परिसरात इंडियन आयडलच्या ऑडिशन्स सुरु होत्या. त्यावेळी तिथे फार कमी लोक आले होते. कारण हा शो नेमका काय, त्यात काय असणार याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मी आणि माझे बरेच मित्र टाईमपास करावा म्हणून त्या रांगेत उभे राहिलो. काही वेळाने माझे बरेच मित्र निघून गेले. पण मी मात्र तिथेच थांबलो आणि ऑडिशन दिली.

त्यानंतर याचं हळूहळू प्रमोशन सुरु झालं. तेव्हा सगळ्यांना समजलं की हा खूप मोठा शो आहे. अशाप्रकारे छोट्या स्टेजवरुन मी इंडियन आयडलच्या मोठ्या स्टेजवर आलो. त्यांच्या माध्यमातून मी जगासमोर आलो”, असे अभिजीत सावंतने म्हटले.